" रंग रंगात माझ्या रंगून जा तू....
अंग अंगात माझ्या मिसळून जा तू.....
होऊन पाउस माझ्या मनाचा....
हया तप्त भूमि वर बरसुनी जा तू .....
मृदगंध हया मनाला देऊन जा तू .....
होऊन वसंत हया मनाची...
बाग़ फुलवुन जा तू.....
सुगंध हया कळीला देऊन जा तू .....
होऊन श्वास माझा ...
अणू-रेणूत माझ्या भिनून जा तू ....
स्पर्शून माझ्या आत्म्याला....
ओळख जन्मानतरीची देऊन जा तू ...."
1 comment:
chaanglya rite lihilela ahe,keep it up
Post a Comment